
Services

Schemes

About Us
Sarpanch Message
निता कांदोळकर
सरपंच सांगोल्डा
*माझ्या माझा संपूर्ण सांगोल्डा गाव म्हणजे माझं एक विस्तारित कुटुंब आहे , ही भावना मनात कायम ठेऊन मी ह्या गावातील हर एक माणसाचं सुखं दुख समजून घेऊन त्याना चांगल्या सुविधा मिळवून देण्या साठी माझ्या सहयोगी सदस्याच्या सहकार्याने मी पुढची पाच वर्षू झटत राहीन.
*समाजाच्या सर्व घटकामध्ये समभाव राखून गावाचा सर्वागीण विकास साधणे हेच माझे मुख्य ध्येय आणि धोरण असेल.
* शेती, पर्यावरण, वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा निचरा ह्या गोष्टीकडे माझे विशेष ध्यान असेल.
*राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनाचा फायदा गावातील वृद्ध, महिला आणि युवकाना देण्या बद्दल मी तत्पर राहीन.
*महिला व युवकाना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आर्थिक व व्यावसायिक मार्गदर्शन मी मिळवून देईन.
*वयोवृद्धासाठी वाचनालय व करमणुकीची एक हक्काची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन
*गावात मुबलक पाणी आणि अखंडित वीजपुरवठा, रस्याची नियमित दुरूस्ती मेन्टेनन्स ची सेवा पुरवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
* दुग्ध व्यावसाय, कुक्कुटपालन, भाजीपाला लागवडी सारख्या गावातील पारंपारिक व्यवसायाना सरकारी योजनेच्या सवलती देऊन वॉकल फोर लोकल तत्वावर अनुदान देण्याचा प्रयत्न करीन.
*अनाधिकृत, बेकायदेशीर बांधकामांना थारा देणार नाही.
* विध्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन, शिष्यवृत्त्याची तरतूद करण्याचा प्रयत्न करीन.
* पर्यावरणाला मारक न ठरणाऱ्या पण पर्यटन व्यवसायाला उभारी देणाऱ्या व्यावसायाना प्राधान्य देईन.
* दारिद्य्र रेषेत असणाऱ्या गावकऱ्यांच्या सांपत्तिक स्थितीत सुधारणा करुन गावाला सधन बनविण्या साठी सगळ्या सरकारी योजनांचा रितसर वापर करीन.
*माझ्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाच्या सर्वागीण विकासा साठी हिता साठी काम करण्यासाठी कटिबद्ध राहीन.